खीर हा गोड पदार्थ सर्वांना आवडणारा असा आहे. महाराष्ट्र मध्ये गुढीपाड्व्या ला खिरी ला जास्त महत्व दिल जात . भारता मध्ये प्रत्येक सण हा special जेवण सोबत असा होतो . आपण पाहणारं आहात ते म्हणजे गोड चॉकलेट ची शेवयांची खीर .
साहित्य :
- १ वाटी शेवया
- १ वाटी सुजी
- १ वाटी ओल्या नारळाचा खिस
- २ tbsp तीळ
- १ tbsp खसखस
- १ tbsp वेलची पावडर
- काजू बदाम चे काप १/२ वाटी
- १/२ लिटर दूध
- २+१/२ वाटी साखर
- १ बार चॉकलेट (२० rs )
- ४ tbsp तूप
- २ tbsp ऑइल
- १/४ चमचा मीठ
कृती :
एका पातेले मध्ये गरम झाल्यांनतर medium flame वरती सुजी brownish भाजून घ्या तूप टाकून . नंतर सुजी काढून शेवया हि ब्राउनिश तूप टाकून भाजून घ्या , तसेच नंतर ओल्या नारळाचा खिस करून घेऊन हलकंसं भाजून घ्या तूप टाकून . हे सर्व भाजून घ्या
आता त्याच पातेले मध्ये तूप टाकून सोबत ऑइल हि टाका आणि गरम झाल्या नंतर त्यामध्ये काजू बदाम चे काप टाका . थोडस परतून घ्या आणि काढून घ्या , त्यामध्ये खसखस घाला , थोडे खसखस हे परतून घेऊन त्या मध्ये तीळ टाका आणि हलवून घ्या . थोडस च ब्राउनिश असं होऊद्या आता आपण भाजून घेतलेलं सुजी , शेवया आणि ओल्या नारळाचा खिस ऍड करा . सगळं मिश्रण हलवून घेऊन त्या मध्ये साखर ऍड करा आणि वेलची पावडर , काजू बदाम चे काप टाका ,आता त्यामध्ये दूध घाला आणि चांगलं हलवून घ्या , तसेच त्यामध्ये २ ग्लास पाणी घाला .
तुम्हाला हवी तशी thickness ची पाणी ऍड करून खीर वाढवू शकता सर्व ढवळून घ्या ,आता त्या मध्ये चिमूटभर मीठ टाका .मीठ टाकल्यानं खिरीची चव हि छान लागते . आता ७-८ मिनिटे साठी लो flame वरती शिजू द्या . अधून मधून हलवत रहा . आता खीर खाण्यासाठी तयार आहे .
सर्व्ह करताना खीर त्या वरती चॉकलेट गार्निश खिस करून टाका. मस्त अशी चॉकलेट flavour ची चव लागते ,लहान मुलांना फार आवडेल try करून पहा .
********************************************************************************************************************************
Chocolate Kheer -
Kheer is a sweet treat that everyone loves. In Maharashtra, Gudipadva is given more importance than Khiri. Every festival in India is accompanied by a special meal. All you have to do is look at the sweet chocolate vermicelli kheer .
Ingredients:
- 1 cup vermicelli
- 1 cup semolina
- 1 cup wet coconut
- 2 tbsp sesame seeds
- 1 tbsp poppy seeds
- 1 tbsp cardamom powder
- 1/2 cup sliced cashew nuts
- 1/2 liter milk
- 2 + 1/2 cup sugar
- 1 bar chocolate (20 rs)
- 4 tbsp ghee
- 2 tbsp oil
- 1/4 teaspoon salt
Action:
After heating in a pan, fry semolina brownish on medium flame with ghee. Then take out the semolina and fry the shevaya with brownish ghee, then grate the wet coconut and lightly fry the ghee. Bake it all
Now put ghee in the same pan, add oil and after it is hot, add cashew nuts and almonds. Saute and remove the poppy seeds, add poppy seeds, fry the poppy seeds, add sesame seeds and stir. Now add some roasted semolina, vermicelli and wet coconut. Stir the mixture, add sugar and add cardamom powder, cashew nuts and almonds, now add milk and stir well, add 2 glasses of water.
You can increase the kheer by adding water of desired thickness. Stir everything. Now add a pinch of salt in it. Adding salt makes the kheer taste better. Now cook on low flame for 7-8 minutes. Keep moving from time to time. Now the kheer is ready to eat.
When serving, sprinkle chocolate garnish on top of the kheer. It tastes like a nice chocolate flavor, kids will love it, try it.
0 Comments