French-fries Homemade
फ्रेंच - फ्राइज बनवा आता घरच्या घरी , फ्रेंच -फ्राइज ही मुळची रेसीपी युरोप ,बेल्जियम आणि फ्रान्स ची आहे . फ्रेंच फ्राइज म्हणजे बटाट्याचे चौकोनी आकार मध्ये उभे काप करून तळले जातात . फ्रेंच फ्राइज ला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नाव ने ओळखल जाते- फ्रेंच- फ्राइज,फिंगर चिप्स . स्नॅक्स म्हणून फ्रेंच फ्राइज बऱ्याच ठिकाणी सॉस आणि मेयोनीज सोबत खाल्ल जात .
साहित्य :
- 3 बटाटे मोठे
- तळण्यासाठी तेल
- चविनुसार मीठ
- 1 चमचा चाट मसाला
- 1/2 चमचा तिखट (हव असेल तर )
कृती :
3 मोठे आकाराचे बटाटे घ्या . (ज्या बटाट्या मध्ये साखर ही कमी असते असे यूज करा - कारण जास्त स्टार्च असलेले बटाट्या च वापर केल्याने बटाटा हा तळल्या नंतर मऊ पडतो. किंवा जे बटाटे जास्त वेळ साठी store करून ठेवलेले असतात ते use करू शकतो.)
बटाट्याचे साल काढून किंवा तसेच ही घेऊ शकता.बटाट्याचे उभे काप 3 मि.मि ह्या साइज मध्ये चौकोनी असे करून घ्या . बटाटे चे काप पाण्या मध्ये टाकून त्याच स्टार्च काढून घ्या .2-3 वेळ थंड पाण्याने धुऊन घ्या . हे काप आता 2 मिनीट साठी पाण्या मध्ये अर्ध चमचा मीठ घालून शिजू द्या . नंतर ते काप चाळणी मध्ये घेऊन पूर्ण पानी निथळे पर्यन्त ठेवा , एक रुमाल वरती काढून घ्या . आणि पुसून घ्या .
बटाटे हे 2 स्टेप मध्ये तळलेले छान लागतात . प्रथम बटाटे मीडियम फ्लेम वरती गरम तेल मध्ये हलकेसे तळून घ्या , तळलेले हे बटाटे तुम्ही फ्रीज ला store करून ठेवा 2 तास साठी आणि हवे तेव्हा गोल्डन brownish कलर येईपर्यंत मोठ्या फ्लेम वरती तळून घ्या . (बटाटे 2 स्टेप मध्ये तळण्याच कारण . जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही हे तळलेले बटाटे घेऊन फ्रीज मधील तळू शकता म्हणजे वेळ वाचेल , दुसर म्हणजे फ्रीज केलेल जेव्हा आपण तळतो तेव्हा ते अधिक चंगल्या रित्या तळले जातात.)
तळलेले हे आता brownish गोल्डन असे बटाटे डिश मध्ये घ्या ,गरमा गरम असताना च त्या मध्ये चाट मसाला आणि मीठ घाला सर्वत्र चाट मसाला आणि मीठ लागेल अस हलवून घ्या . आणि serving डिश मध्ये फ्रेंच - फ्राइज आणि टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज सोबत खाण्यास द्या .
_______________________________________________________________________________________________________________
French-fries Homemade
Make French-fries Now at home, French-fries are the original recipe from Europe, Belgium and France. French fries are fried potatoes cut into squares. French fries are known by different names in many places - French - fries, finger chips. French fries as a snack are often eaten with sauce and mayonnaise.
Ingredients:
- 3 large potatoes
- Oil for frying
- Salt to taste
- 1 tablespoon chaat masala
- 1/2 tsp Chili powder (if desired)
Action:
Take 3 large sized potatoes. (Use potatoes that are low in sugar - because using starchy potatoes only makes them softer after frying. Or you can use potatoes that have been stored for a long time.)
Peel a squash, grate it and squeeze the juice. Cut the potato into 3 mm squares. Put the potato slices in water and remove the same starch. Wash with cold water 2-3 times. Now cook these slices by adding half a teaspoon of salt in water for 2 minutes. Then take the slices in a sieve and keep it till the water drains completely, remove the top with a napkin. And wipe.
Potatoes look great fried in 2 steps. First, lightly fry the potatoes on medium flame in hot oil. Store these fried potatoes in the fridge for 2 hours and fry on a large flame till golden brownish color when desired. (The reason is to fry the potatoes in 2 steps. You can take these fried potatoes and fry them in the fridge whenever you want, which means you will save time, secondly, it will be frozen. When you fry them, they are fried better.)
Now take the fried brownish golden potatoes in a dish, add chaat masala and salt while it is still hot, stir in the chaat masala and salt everywhere. And in a serving dish, serve with french fries and tomato sauce or mayonnaise.
_______________________________________________________________________________________________
0 Comments