मिसळ-पाव

* मिसळ *



मोड आलेल्या मटकीचे फायदे

                              मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. आपण पाहतो अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खाण्यास प्राधान्य देतात. मटकीत नेमके काय गुणधर्म आहेत, मटकी नेमकी कशी फायदेशीर आहे जाणून घेऊयात.



  • प्रोटिनचा स्रोत

                   भारतातील अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खातात, कारण मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असतं, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला मांसाहार न करण्याचा सल्ला दिला असेल, तर शरीराला गरजेच्या असलेल्या प्रोटिनची कमतरता मटकीच्या सेवनानं भरून निघेल.

  • सौंदर्य वाढवते

              मटकीमध्ये आढळणारं प्रोटिन हे अमिनो असिडयुक्त असतं, जे त्वचा सुंदर ठेवण्यासाठी गरजेचं असतं. त्वचेची जखम भरून काढण्यातही हे अमिनो असिड फायद्याचं आहे. तसंच जर तुम्हाला तुमची नखं आणि केस मजबूत ठेवायचे असतील तर मटकीचा आहारात समावेश जरूर करा.

  • मलावरोध दूर करते

मलावरोधाची समस्या असल्यास तुमच्या आहारात फायबरची कमतरता असते. मटकीचा आहारात समावेश केल्यास फायबर मिळतं. यासोबत द्रव पदार्थांचं सेवन आणि व्यायाम केल्यास दररोज होणारा मलावरोधाचा त्रास दूर होईल.

  • रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते

तज्ज्ञांच्या मते, फायबरयुक्त मटकीमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहतं. रक्तात किती प्रमाणात साखर असावी यावर फायबर नियंत्रण करतं. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना मटकी आणि इतर फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

  • रक्तदाब कमी होतो

मटकीतील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतं, कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तदाब वाढू शकतो. तसंच मटकीती पोटॅशिअममुळे रक्तवाहिन्यांचं काम सुरळीत चालतं, ज्यामुळे रक्तदाब कमी राहतो.

  • अॅनिमियापासून संरक्षण

गरोदर महिला आणि मासिक पाळीत अति रक्तस्राव होणाऱ्या महिलांना विशेषत: अनिमियाचा धोका जास्त असतो. अनिमिया होऊ नये, यासाठी आहारात नियमित आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. मटकी हा आयर्नचा स्रोत आहे.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते

डॉक्टरांच्या मते, मटकीमध्ये झिंक असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्ट्रेसमुळे होणाऱ्या हानीकारक परिणामांपासूनही झिंक संरक्षण देतं. त्यामुळे तुम्हाला जर स्ट्रेस आल्यासारखा वाटत असेल, तर आहारात मटकीचा समावेश करा.



                             आज आपण पाहणार आहोत मटकी पासून मिसळ ची भाजी कशी करयची ते . 


साहित्य :

  • 2 वाटी मोड आलेली मटकी 
  • 2 कांदा उभे काप करून 
  • 2 टोमॅटो चिरून 
  • 2 हिरवी मिरच्या 
  • 5-6  पाकळी लसूण 
  • 1/2 वाटी खोबर लसूण ची पेस्ट मसाला 
  • कढीपत्ता 4-5 पाने 
  • 1/2 वाटी कोथिंबीर चिरून 
  • 1/2 चमचा लिंबुच रस 
  • आवश्यकतेनुसार पानी 


मसाले :

  • 1+1/2 चमचा तिखट (घरच तिखट ही वापरू शकता )
  • 1/2 चमचा हळद 
  • 1 चमचा मीठ (चवीनुसार)
  • 1/4 चमचा हिंग 
  • 1 चमचा धना पावडर
  • 1/2 चमचा जिरे  
  • 2 चमचा ऑइल 

कृती :

  1. मोड आलेली मटकी धुऊन घेऊन थोडीशी कढई मध्ये परतून घ्या . 
  2. चीरलेला कांदा आता भाजून घ्या brownish असा ,तसेच टोमॅटो ही 1/2 चमचा तेल घालून परतून घ्या . 
  3. लसूण आणि जिरे ठेचून घ्या . 
  4. कढई मध्ये ऑइल टाका आता त्या मध्ये कढीपत्त्याचे पाने टाका . तसेच जिरे लसूण बारीक ठेचून घेतलेला  ,मिरची उभे काप करून घेतलेली तेला  मध्ये टाका . गोल्डन असा लसूण ला कलर येताच खोबरे लसूण चे वाटण brownish  अस भाजून घ्या .
  5. आता त्यामध्ये च भाजून घेतलेला कांदा टोमॅटो टाकून हलवून घ्या , सांगितल्या प्रमाणे मसाले अॅड करा ,तिखट + हळद +हिंग+ मीठ +धना पावडर. 
  6. त्या मध्ये च मोड आलेली मटकी आपण हलकीशी परतून घेतेलेली अॅड करा . सर्व मिश्रण हलवून घेऊन . त्यामध्ये 3 ग्लास पानी घाला .  आणि मीडियम  फ्लेम वरती भाजी शिजू द्या 7-8 मिनीट साठी . 
  7. मिसळ साठीची भाजी आता आपली तयार आहे खाण्यास . 
  8. डिश मध्ये एक वाटीत मिसळ ची भाजी , 1 वाटी मध्ये फरसाणा घ्या ,सोबत बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू घेऊन,मिसळ चे पाव /ब्रेड  सोबत खाण्यास घ्या आणि  डिश serve करा . 

_________________________________________________________________________________________________________________


 

English translation:


* Misal*





Benefits of sprout moth bean 


                              Modification of Matki enhances its properties. Matki is widely used in Indian cuisine. The pot is soaked and goes raw or partially boiled and eaten. Matki is also used as a salad. Modification of Matki enhances its properties. We see that many bodybuilders prefer to eat matki. Let us know exactly what are the properties of Matki, how exactly is Matki beneficial.



Source of protein


                   Many bodybuilders in India eat Matki because it contains a lot of protein, which strengthens the muscles. If you are a vegetarian or your doctor has advised you not to eat meat, you will be able to make up for the lack of protein your body needs.


Enhances beauty


              The protein found in matki is rich in amino acids, which are needed to keep the skin beautiful. This amino acid is also beneficial in healing skin wounds. Also, if you want to keep your nails and hair strong, you must include Matki in your diet.


Eliminates constipation


               If you have constipation, your diet is low in fiber. Incorporating Matki in the diet provides fiber. In addition, daily intake of fluids and exercise will eliminate the problem of constipation.


Blood sugar levels remain under control


                   According to experts, fiber-rich matki helps control blood sugar levels. Fiber controls the amount of sugar in the blood. Therefore, diabetics are advised to consume Matki and other fiber rich foods.


Lowers blood pressure


                     Matki fiber lowers cholesterol in the body, cholesterol can block blood vessels and increase blood pressure. Potassium also helps in smooth functioning of blood vessels, which in turn lowers blood pressure.


Protection against anemia


                 Pregnant women and women with heavy menstrual bleeding are especially at higher risk of anemia. To prevent anemia, it is important to include regular iron-rich foods in the diet. Matki is a source of iron.


Boosts the immune system


             According to doctors, Matki contains zinc, which boosts the immune system. Zinc also protects against the harmful effects of stress. So if you feel stressed, include Matki in your diet.


                             Today we are going to see how to make misal bhaji from matki.




Ingredients:


  • Moth bean sprout with 2 cups 
  • By 2 onion slices
  • 2 chopped tomatoes
  • 2 green chillies
  • 5-6 cloves garlic
  • 1/2 cup coconut garlic paste masala
  • 4-5 leaves of curry
  • 1/2 cup chopped cilantro
  • 1/2 teaspoon lemon juice
  • Water as needed





Spices:


  • 1 + 1/2 tsp chili powder (you can also use chili powder at home)
  • 1/2 teaspoon turmeric
  • 1 tbsp salt (to taste)
  • 1/4 teaspoon asafoetida
  • 1 tablespoon coriander powder
  • 1/2 teaspoon cumin seeds
  • 2 tablespoons oil




Action:


  1. Wash the sprouted moth bean and return it to the pan.
  2. Now fry the chopped onion till it becomes brownish.
  3. Crush the garlic and cumin seeds.
  4. Add oil to the pan. Now add curry leaves. Also add cumin seeds, finely chopped garlic and chopped chillies in oil. As soon as the garlic turns golden, fry the coconut garlic until brownish.
  5. Now add roasted onion, tomato and stir, add spices as mentioned, red chilli powder + turmeric powder + asafoetida + salt + coriander powder.
  6. Add the pot that you just took back. By stirring all the mixture. Add 3 glasses of water. And cook the vegetables on medium flame for 7-8 minutes.
  7. The vegetables for the mix are now ready to eat.
  8. In a bowl, take 1 cup of misal vegetables, 1 cup of farsana, along with finely chopped onion and lemon, eat with misal bread and serve the dish.




Post a Comment

0 Comments