नगपंचमी ला महाराष्ट्र मध्ये आणि कर्नाटक मध्ये पूरणाचे दिंडे केले जातात . नागच पूजन करण्यास हा पदार्थ करतात . पाहुयात रेसीपी पूरणाचे दिंडे कसे बनवायचे .
साहित्य :
- 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ
- 1/2 वाटी गूळ खिसलेला
- 1/4 चमचा वेलची पावडर
- 1 कप गहुच पीठ
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार पानी
- 2 चमचा तूप
कृती :
डाळ धुऊन घ्या . कुकर मध्ये 1 ग्लास पानी घालून शिजवून घ्या, 3 शिट्या करून घ्या. शिजलेली डाळीमधून सर्व पानी निथळून घ्या . कढई मध्ये खिसलेला गूळ घाला ,आता शिजलेली डाळ घाला . आणि पूर्ण गूळ विरघळे पर्यन्त हलवून घ्या . आता त्यामध्ये वेलची पावडर घाला , पुरणच्या पोळी साठी तयार करतो तसेच करा
आता गहूच्या पिठाची पानी आणि थोडस मीठ घालून कणिक मळून घ्या. चपाती साठी करतो तसेच. चपाती साठी लागतो इतक कणिक चा गोळा करून घ्या , छोटीशी लाटी लाटून त्यावरती मधोमध आयताकृती आकार मध्ये पुरण घाला . 1 मूठ इतक .दोन्ही साइड ने प्रथम कवर करा नंतर राहिलेल्या दोन्ही साइड ने कवर करा . आणि पॅक करून घ्या .
fraying पॅन मध्ये थोडस तूप टाकून brownish अस भाजून घ्या . तयार आहेत पूरणाचे दिंडे .
0 Comments